म्हणुनच हरायचं आहे मला!
हारते प्रत्येक वेळी हारते
पण , नव्याने खेळ मांडायला कधीच हारत नाही
माहित आहे यावेळी पण मीच हरणार आहे
तरीही , नवीन खेळ सुरु करण्याची जिद्द मात्र कधीच हारत नाही
इथे आहे कोणाला जिंकायचं आणि आहे कोणाला हरवायचं
मला तर फक्त आहे खेळायचं
जिंकले जरी मी
तरी हार माझीच आहे
माहित आहे तो मला हरवणारच
पण, काय माहित कधी चुकून माझ्यात हरवला तर.......
म्हणूनच हरायचं आहे मला
एकदा न एकदा हरवायचं आहे त्याला
म्हणुनच हरायचं आहे मला
- भाग्यश्री कांबळे
No comments:
Post a Comment